विदर्भ निधी अर्बन तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेऊन येते एक खास योजना. या योजनेंतर्गत, तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी, तिच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि तिच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यासाठी स्थैर्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नियमित गुंतवणूक करून, सुरक्षिततेची हमी असलेला एक मोठा निधी तयार करा, जो भविष्यातील मोठ्या गरजा पूर्ण करेल.
मुदत ठेव योजना
कष्टाने जमवलेली बचत योग्य ठिकाणी गुंतवणे महत्त्वाचे आहे, जिथे सुरक्षिततेची आणि आकर्षक परताव्याची हमी असते. म्हणूनच विदर्भ निधी अर्बनची मुदत ठेव योजना आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज मिळते. त्यामुळे गुंतवणूक कमाईचे साधन बनू शकते.
मुदत ठेव योजनेबद्दल अधिक माहिती आणि गुंतवणुकीसाठी नजीकच्या विदर्भ निधी अर्बनला भेट द्या.
आवर्त ठेव योजना
अनेक वेळा घरी येणारे पैसे कुटुंबाच्या छोट्या गरजांसाठीच वापरले जातात, त्यामुळे गरजेच्या वेळी खात्यात काहीच उरलेलं राहत नाही. म्हणूनच, एक शिस्तबद्ध पद्धतीने बचत करणे महत्त्वाचे आहे, आणि त्यासाठी विदर्भ निधी अर्बनची आवर्त ठेव योजना आहे. दरमहा केलेली ही छोटी गुंतवणूक मोठ्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी मदत करेल.
आवर्तक ठेव योजनेबद्दल अधिक माहिती आणि गुंतवणुकीसाठी नजीकच्या विदर्भ निधी अर्बनला भेट द्या.
मासिक ठेव योजना
आपण कायम म्हणतो ‘थेंबे-थेंबे तळे साचे’. म्हणूनच, भविष्याची तयारी करा आणि संस्थेच्या मासिक ठेव योजनेत दरमहा थोडी गुंतवणूक करा. निवृत्तीनंतर एक आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे. आपल्या मासिक ठेव योजनेचा परतावा थेट आपल्या खात्यात जमा होईल. आजची थोडी गुंतवणूक म्हणजे उद्याचा आनंद!
मासिक ठेव योजनेमध्ये गुंतवणूक व अधिक माहितीसाठी नजीकच्या विदर्भ निधी अर्बनला भेट द्या.
दैनंदिन ठेव योजना
दैनंदिन कमाई रोज हातात येत असली तरी महिन्याच्या शेवटी काहीच शिल्लक पडत नाही? मग अशा परिस्थितीत विदर्भ निधी अर्बन ची दैनंदिन ठेव योजना तुमच्यासाठी आहे सर्वोत्तम योजना, आपल्या कमाईतला अगदी छोटासा भाग या योजनेत गुंतवायचा आहे, काही वर्षांनंतर ही छोटीशी गुंतवणूक आकर्षक व्याजदरासह एक मोठी रक्कम झालेली असेल, जी करेल तुमचे स्वप्न पूर्ण. दैनंदिन ठेव योजनेमध्ये गुंतवणूक व अधिक माहितीसाठी नजीकच्या विदर्भ निधी अर्बनला भेट द्या.
दाम दीडपट ठेव योजना
तुमचे पैसे काही वर्षांत दीडपट होऊ शकतात! तुमच्या मोठ्या स्वप्नांसाठी विदर्भ निधी अर्बनच्या दाम दीडपट ठेव योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा दीडपट परतावा. अशक्य वाटणाऱ्या स्वप्नांची पूर्तता करण्याची तयारी आजपासूनच करा!
दाम दीडपट ठेव योजनेमध्ये गुंतवणूक व अधिक माहितीसाठी नजीकच्या विदर्भ निधी अर्बनला भेट द्या.
दाम दुप्पट ठेव योजना
आजच्या काळात प्रत्येकालाच आपली गुंतवणूक दुप्पट व्हावी असे वाटते, पण त्यासाठी ती विश्वसनीय ठिकाणीच करावी लागते, जिथे खात्रीशीर परतावा मिळतो. म्हणूनच विदर्भ निधी अर्बनची दाम दुप्पट ठेव योजना निवडा, जी तुम्हाला सुरक्षितता आणि परताव्याची हमी देईल.
दाम दुप्पट ठेव योजनेत गुंतवणूक करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी जवळच्या विदर्भ निधी अर्बनला भेट द्या.
QR सेविंग दैनंदिन ठेव योजना
QR सेव्हिंग्ज डेली डिपॉझिट प्लॅन ही एक खास बचत योजना आहे, ज्यामध्ये दररोज थोडीशी रक्कम जमा करून भविष्यातील गरजांसाठी मोठी रक्कम उभी करता येते. या योजनेमुळे नियमित बचतीला प्रोत्साहन मिळते आणि जमा रकमेवर आकर्षक व्याजदर देखील मिळतो. दररोजची बचत केल्याने आर्थिक शिस्त निर्माण होते, तसेच हे गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय ठरते.
QR सेविंग दैनंदिन ठेव योजनेच्या माहितीसाठी जवळच्या विदर्भ निधी अर्बनला भेट द्या.
शिक्षाबचत ठेव योजना
विदर्भ निधी अर्बनची शिक्षाबचत ठेव योजना म्हणजे तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या स्वप्नांसाठी एक सुरक्षित गुंतवणूक योजना! या योजनेत नियमित बचत करून तुम्ही भविष्यातील शैक्षणिक खर्चांसाठी एक ठोस आर्थिक आधार तयार करू शकता. योजनेत गुंतवणूक केल्यावर आकर्षक व्याजदरासह तुमची रक्कम वाढेल, जेणेकरून मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेली रक्कम सहज उपलब्ध होईल.
अधिक माहितीसाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी जवळच्या विदर्भ निधी अर्बनला भेट द्या.