x
logo

व्यावसायिक कर्ज

विदर्भ निधी अर्बन कंपनी आता नवीन कंपनी सुरू करण्यासाठी किंवा वर्तमान कंपनी वाढवण्यासाठी तुमची भागीदार आहे. तुमच्या सर्व व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही येथे आहोत, मग त्यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणे, भांडवली खर्च, नवीन यंत्रसामग्री किंवा ऑपरेटिंग खर्च यांचा समावेश आहे. कमी केलेले कर्ज दर आणि जलद मंजूरी तुम्हाला स्पर्धेच्या पुढे राहण्यास मदत करेल.

पगार तारण कर्ज

जीवनात अनेकदा अनपेक्षित प्रसंग येतात ज्यामुळे काही खर्च टाळता येत नाहीत, जसे की घराची दुरुस्ती, शाळेचे खर्च, आजारपण किंवा इतर आवश्यक खर्च. अशा वेळी विदर्भ निधी अर्बन कंपनी तुमच्यासोबत आहे, कारण पगार देखील पुढे ढकलला जाऊ शकत नाही. सहकारी पतसंस्थेकडून पगारावर आधारित तारण कर्ज उपलब्ध आहे. त्यामुळे मोठ्या किंवा छोट्या अडचणींना कायमचा निरोप द्या.

वाहन कर्ज

तुम्ही नोकरदार असाल किंवा व्यावसायिक, आज वाहन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. स्वतःची कार किंवा बाईक असणे म्हणजे हवे तेव्हा हवे तिथे जाण्याचे स्वातंत्र्य. मात्र, दरवर्षी वाहनांच्या किमती वाढत आहेत, ज्यामुळे ती मोठी रक्कम देणे प्रत्येकासाठी शक्य नसते. म्हणूनच, विदर्भ निधी अर्बन आपल्यासाठी वाहन कर्ज घेऊन येत आहे, कमी व्याजदरात आणि तात्काळ मंजुरीसह.

सोने तारण कर्ज

आर्थिक अडचणींमध्ये ऐनवेळी पैसे जमवणे ही मोठी समस्या असते. अशा वेळी तुमचं सोनंच तुमची मदत करू शकतं. विदर्भ निधी अर्बनच्या सोने तारण कर्ज योजनेतून कमी वेळेत, कमी कागदपत्रांसह तुम्हाला पैसे मिळू शकतात. सोने तारण ठेवून पैसे घेणे सोपा आणि सोयीस्कर मार्ग आहे, शिवाय व्याजदरही खूप कमी आहे.

कॅश क्रेडिट कर्ज

 

व्यवसाय सुरु केल्यानंतर कधी आणि कशासाठी पैशांची गरज भासेल सांगता येत नाही. याच गरजा पूर्ण करण्यासाठी विदर्भ निधी अर्बन तुम्हाला कॅश क्रेडिट सुविधा देते. योग्य वेळी आणि योग्य दरात मिळणारे हे कर्ज तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीत कोणतीही आर्थिक अडथळा येऊ देणार नाही.

ठेव तारण कर्ज

आता आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला तुमची मालमत्ता विकण्याची गरज नाही. अनेकदा गरजेच्या वेळी संपत्ती विकण्याचे कठोर निर्णय घ्यावे लागतात, पण आम्ही तुमच्या अडचणी समजतो, म्हणूनच आम्ही तारण कर्ज देतो. तुम्ही आपली संपत्ती तारण ठेऊन आवश्यकतेनुसार कर्ज घेऊ शकता आणि संपत्ती न विकता तुमच्या गरजा पूर्ण करू शकता.

हरितक्रांती कर्ज योजना

देशाचा अन्नदाता शेतकरी कायम आनंदी राहणं गरजेचं आहे, त्याच्या अडचणी व त्याच्यावर येणारी संकट जाणतो आम्ही आणि म्हणूनच बळीराजाच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विदर्भ निधी अर्बन देते समृद्ध शेतकरी कर्ज. कारण अन्नदाता समाधानी असेल तरच देशाची भूक भागेल.

मॉरगेज कर्ज

मॉरगेज कर्ज हे आपली मालमत्ता तारण ठेवून मिळणारे कर्ज आहे. घर खरेदी, बांधकाम, किंवा नूतनीकरणासाठी हे कर्ज घेतले जाऊ शकते. तारण ठेवलेली मालमत्ता म्हणजे घर, जमीन किंवा व्यावसायिक मालमत्ताही असू शकते. कर्जाचे व्याजदर आणि परतफेडीची कालावधी कर्जाच्या प्रकारानुसार वेगवेगळे असतात.

नवीन मोबाईल कर्ज

नवीन मोबाईल घ्यायचं आहे तर तुम्ही नजीकच्या भंडारा जिल्ह्यातील निवडक मोबाईल स्टोर्स वर जाऊन तुमचा नवीन मोबाईल तारणावर घेऊ शकता,विदर्भ निधी मोबाईल कर्ज योजनेतून ,दुकानदाराला साधी कागदपत्रे जमा करा आणि 15 मिनिट मध्ये नवीन मोबाईल तारणावर विकत घ्या ते पण अगदी 0% व्याजदरावर, त्वरीत मंजुरी, सीबील ची गरज नाही ते पण 6/7/8 मासिक किस्तीवर.

एलआयसी (LIC) पॉलिसी तारण कर्ज योजना

पैशांच्या बाबतीत चुकीचे निर्णय महागात पडू शकतात, गरजेच्या वेळी गडगंज महागडे कर्ज घेण्या ऐवजी आता अत्यंत सोप्या पद्धतीने आपली गरज पूर्ण करा. विदर्भ निधी अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या एलआयसी (LIC) पॉलिसी तारण कर्ज योजना अंतर्गत, अत्यल्प दरात, एलआयसी पॉलिसी तारण ठेवून मिळवा झटपट लोन.

नवीन घर बांधणी कर्ज

घर घेणं प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण आजच्या काळात स्वतःचं घर घेणं सोपं नाही. घर घेणं म्हणजे अनेक खर्च येणं, हे आम्हाला ठाऊक आहे. म्हणूनच विदर्भ निधी अर्बन कमी व्याजदराने गृह कर्ज देते. तुमच्या स्वप्नाच्या घराला तुमच्या नावाची पाटी लागण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सेवेत आहोत.

एलआयसी (LIC) पॉलिसी तारण कर्ज योजना

पैशांच्या बाबतीत चुकीचे निर्णय महागात पडू शकतात, गरजेच्या वेळी गडगंज महागडे कर्ज घेण्या ऐवजी आता अत्यंत सोप्या पद्धतीने आपली गरज पूर्ण करा. तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या एलआयसी (LIC) पॉलिसी तारण कर्ज योजना अंतर्गत, अत्यल्प दरात, एलआयसी पॉलिसी तारण ठेवून मिळवा झटपट लोन.